छातीवर बसून पोटच्या मुलाला आईनेच केली बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

video viral cruel mother 

⬇️⬇️⬇️

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे

क्लिक करा

https://twitter.com/i/status/1813561038228582910

 

https://twitter.com/i/status/1813561038228582910

आई आपल्या मुलावर निस्वार्थ प्रेम करते. असे म्हणतात की जेव्हा ती आपल्या मुलाला संकटात पाहते तेव्हा ती स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याच्यासाठी काहीही करण्यास तयार असते. मात्र, आता अशी घटना समोर आली आहे, जी वाचून तुमचा थरकाप उडवल्याशिवाय राहणार नाही. जन्मदात्या आईच मुलाला बेदम मारहाण करत असल्याचे समोर आले आहे. एका आईने आपल्या मुलाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

⬇️⬇️⬇️

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे

क्लिक करा

https://twitter.com/i/status/1813561038228582910

 

एका क्रूर आईने आपल्या मुलावर अत्याचार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये महिला मुलाच्या छातीवर बसून मुलाला लाथ मारताना दिसत आहे. ही महिला त्या मुलाच्या छातीवर बसून त्याचे डोके जमिनीवर आपटताना आणि अधूनमधून त्याचा गळा दाबताना दिसत आहे. मूल रडत आहे आणि स्वत:ला वाचवण्याची विनंती करत आहे, आईकडे जीवाची भीक मागत आहे. मुलगा पुन्हा पुन्हा पाणी मागतांना दिसतो, पण तरीही आईचे मन द्रवत नाही. पण, आईला मुलाची अजिबात काळजी नसते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी संताप व्यक्त केला.

व्हिडीओवर महिलेची प्रतिक्रिया

व्हायरल व्हिडीओमध्ये महिलेने पोलिसांना सांगितले की, तिचा पतीसोबत गेल्या दहा वर्षांपासून वाद सुरू असून पती घरी राहत नाही आणि पैसेही पाठवत नाही. बराच काळ तो घरी आलेला नाही. दुकानात काम करून ही महिला केवळ घरखर्च भागवते. पतीला घाबरवण्यासाठी आणि घरातील जबाबदाऱ्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तिने आपल्या मोठ्या मुलासोबत हा व्हिडीओ बनवला होता आणि दोन महिन्यांपूर्वी पतीला पाठवला होता, त्यानंतर तिच्या पतीने तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. महिलेने सांगितले की, मारहाणीदरम्यान तिने मुलाच्या छातीवर डोके ठेवण्याचे नाटक केले होते, परंतु मुलाला चावा किंवा दुखापत केली नाही.

व्हिडीओवर पोलिसांची प्रतिक्रिया

या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उत्तराखंड पोलिसांची प्रतिक्रियाही व्हिडीओवर आली आहे. व्हायरल व्हिडीओवर पोलिसांनी सांगितले की, महिलेचा तिच्या पतीसोबत वाद सुरू होता. तिचा पती घरी येत नाही किंवा तिला राहण्याचा खर्चही देत नाही, अशा परिस्थितीत पतीला घाबरवण्यासाठी महिलेने आपल्याच मुलाला मारहाण करतानाचा व्हिडीओ बनवून पतीला पाठवला होता, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी पुढे सांगितले की, हा व्हिडीओ दोन महिन्यांचा आहे. महिला आणि बालकांचे ‘पहिल्या टप्प्यातील समुपदेशन’ केले जात आहे. कोणत्याही दिवशी महिलेच्या घरी जाऊन मुलाची शारीरिक तपासणी केली जाणार आहे. दुसरीकडे झाब्रेडा पोलिसांचेही या प्रकरणावर लक्ष आहे. महिलेच्या पतीची बाजूही तपासली जात आहे.

Leave a Comment